वाघोली – हर घर तिरंगा अभियानांतर्गत शिरूर हवेली विधानसभा तिरंगा दुचाकी रॅली धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ तुळापूर ते पेरणे फाटा- कोरेगाव – सणसवाडी – शिक्रापूर ते तळेगाव ढमढेरे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारक पर्यंत करण्यात आली. या तिरंगा दुचाकी रॅलीमध्ये पुणे व शिरुर- हवेली विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, शिरूर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदिप कंद, महाराष्ट्र प्रदेश क्रिडा आघाडी अध्यक्ष संदिप भोंडवे, शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप या रॅलीचे संयोजक संदीप सातव यांनी केले. यावेळी उपसभापती रवींद्र कंद, दादा पाटील फराटे , सुदर्शन चौधरी, जयश्रीताई पलांडे , ताराचंद कराळे, गणेश कुटे, शाम गावडे, निवेदिता एकबोटे, भगवान शेळके, मुन्ना राखपसरे, अमोल शिवले, विक्रम पाचुंदकर, पुनमताई चौधरी, विकास जगताप, सुप्रिया गोते, ओंकार कंद, गौरव झुरंगे, रोहित खैरे, सुरत चव्हाण, उमेश शेळके, स्वप्निल कंद, अमोल बाजारे, नितीन गव्हाणे, विजय जाचक, प्रदीप सातव, नितीन गावडे ,दत्ता आबा हरगुडे, दिनेश झांबरे, आण्णाराजे शिवले,इतर अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.