मोहन महाराज शिंदे : श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतर्फे नगर प्रदक्षिणा
आळंदी – श्रीराम कृष्ण वारकरी शिक्षण संस्थने आयोध्या सारखा योग आळंदीत घडविला, असे प्रतिपादन मोहन महाराज शिंदे यांनी केले.
अयोध्या रामनगरी ते प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त सोमवारी (दि. 22) श्रीरामकृष्ण आध्यात्मिक कला क्रीडा सामाजिक प्रतिष्ठान संचालक अंतर्गत आळंदी येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य नगर प्रदक्षिणा दिंडी पार पडली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. तसेच सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आल्यामुळे परिसर भगवामय झाला होता.
ज्ञानेश्वर महाराज संजीवनी मंदिर मुख्य प्रवेशद्वार परिसरात फुलाची आकर्षित अशी सजावट व दिवे लावण्यात आली होती याच प्रवेशद्वारासमोर श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व संपूर्ण धर्मशाळाच्या विद्यार्थ्यांनी भगवे पताके, झेंडे, टाळ-मृदंगासह प्रदक्षिणा मारून ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य परिसरासमोर सर्वांनी नमस्तक होऊन ज्ञानेश्वर महाराज की जय जय श्रीराम या घोषणा दिल्या.
श्री राम कृष्ण शिक्षण संस्था यांनी आयोध्या सारखा योग आळंदीत घडविला. आळंदीत नगरपरिषणा दिंडीसाठी दोनहजार वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थीचा सहभाग होता. महाप्रसादाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वारकारी महामंडळाचे अध्यक्ष विलास बालवडकर, मोहन महाराज शिंदे, राहुल चव्हाण यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी प्रकाश वाडेकर, शंकर योगेश पगडे, शिवाजीराव पगडे, संदीप पगडे, सचिन घुंडरे, सचिन गिलबिले, सचिन शिंदे, दिनकर तांबे आदींचा सहभाग होता.