शिर्डीत उसळला साई भक्तांचा सागर

शिर्डी -लोकसभा निवडणुका, मुलांच्या परीक्षा, तसेच वाढता उष्मा यामुळे मागील चार महिने शिर्डीत भाविकांची गर्दी काहीशी कमी झाली होती. मात्र शनिवारी व रविवारी सलग सुटी आल्याने भाविकांनी साई दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शिर्डी संस्थान प्रशासनावर मोठा ताण आला होता.

यावर्षी रामनवमी उत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव या व्यतिरिक्त साई भक्तांनी शिर्डीकडे भाविकांनी पाठ फिरवली होती. त्यातच लोकसभेच्या निवडणुका ही लागल्या होत्या. त्यात अनेक जण व्यस्त झाले होते. तसेच यंदा उन्हाचा पारा ही चांगलाच वाढला होता. त्या धाकाने भाविक शिर्डीत दाखल झाले नव्हते. तर याच दरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षाही सुरू होत्या. मागील चार महिने भविकांची गर्दी चांगलीच रोडावली होती.

मात्र आता उन्हाचा पारा उतरला आहे. निवडणुका संपून मंत्रिमंडळ जाहीर झाले आहे. त्यामुळे शासकीय नोकरदारांचा व्याप कमी झाला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपून नवीन वर्गातील प्रवेशही झाले आहे. त्यामुळे काल भाविक शनिशिंगणापूर करून आज शिर्डीत साई दर्शनासाठी पहाटेच्या काकड आरतीला हजेरी लावली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. संस्थान प्रशासनाने प्रवेशद्वार क्रमांक तीन बंद केले होते. आपत्ती व्यवस्थापन राबविण्यात आले होते.

मात्र वाहतूक शाखेला होणाऱ्या गर्दीचा अंदाज न आल्याने पिंपळवाडी चौक, लक्ष्मीनगर चौक, साई उद्यान तासन्‌तास वाहनांची गर्दी रखडली होती. साई उद्यानाकडे पोलीस फिरकले सुद्धा नाहीत. तर आरबीएल चौकात गर्दी नसतानाही तेथे पोलीस दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा विना नियंत्रीत असलेली वाहतूक शाखा नियंत्रित अधिकारी नसलेली पहावयास मिळाली. मोठ्या संख्येने भाविक आले होते

Leave A Reply

Your email address will not be published.