वंचित बहुजन आघाडी डॅमेज करणारा पक्ष ; चव्हाण

पाथर्डी – वंचित आघाडी ही मॅनेज होणारी नव्हे, तर डॅमेज करणारी आघाडी असल्याचे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे. येत्या विधानसभेला शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचा निकाल हा प्रस्थापितांना धक्का देणारा असेल असे मत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी व्यक्त केले.

किसन चव्हाण यांची वंचित बहुजन आघाडीच्या महासचिवपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के, जिल्हा महासचिव प्रकाश बापू भोसले, अरविंद सोनटक्के, तुकाराम पवार, छानराज क्षत्रे, शैलेंद्र बोंदाडे, राजेश मढीकर, सुरेश जावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, गेली 70 वर्षे सर्व बहुजन कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या भाड्याच्या घरात राहत होतो, मात्र वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने आम्हाला आमचे हक्काचे घर मिळाले आहे.

हे घर अधिक मजबूत करून शाबूत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही पुढील काळात करणार आहोत. सर्व सामान्य माणूस सत्तेत गेला पाहिजे, असे स्वप्न ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पाहिले आहे. आपल्याला ते पूर्ण करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित पुढाऱ्यांना धक्के देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.