बुध (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील शिंदेवाडी ग्रामपंचायतीचा कार्य अहवाल, विविध विकासकामे व शाळेचे विधायक रचनात्मक शैक्षणिक ऊपक्रम व प्रकल्प यामुळे शिंदेवाडी ग्रामपंचायत व शाळा ग्रामविकास व शैक्षणिक विकासाचे आदर्श दिपस्तंभ ठरले आहेत. या अतुलनीय कार्याचा वारसा सर्वांनी घ्यावा, असे गौरवोद्गार आ. महेश शिंदे यांनी केले.शिंदेवाडी (ता. खटाव) येथील विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अथिती म्हणून उदघाटन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदेवाडीचे सरपंच तानाजी फाळके होते. या प्रसंगी वर्धनगडचे सरपंच अर्जुन मोहिते, बुधचे सरपंच अभयराजे घाटगे, गारवडीचे सरपंच शिवाजी कदम, मोळचे सरपंच जालिधंर वाघ, ललगुणचे सरपंच जयवंत गोसावी, हसेवाडीचे सरपंच विकास घोरपडे, डिस्कळचे माजी पंचायत समितीचे सदस्य मनोज गोडसे, माजी उपसभापती लहुकुमार मदने, पाणी फौंडेशनचे जिंतेद्र शिंदे, पुसेगाव पोलिस स्टेशनचे सपोनि विश्वजित घोडके, ललगुण केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल कदम, लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विकास खांडेकर हे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
आ. महेश शिंदे यांनी शिंदेवाडी शाळेतील सेंद्रीय व पर्यावरणपूरक परसबाग, सौर उर्जा प्रकल्प, रेनहार्वेस्टीग प्रकल्प, जलशुध्दीकरण प्रकल्प, हॅडवॉश स्टेशन, गप्पी मासे हौद, कलादर्पन कक्ष,डिजिटल क्लास रुम व ई-लर्निग याची पहाणी व निरीक्षण करुन शाळचे कौतुक करताना म्हणाले की, “बालमनाचा विकासासाठी शिंदेवाडी शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम, प्रकल्प उपयुक्त आहेत.प्रत्येक पालक व शेतकरी यांनी घराशेजारी सेंद्रीय परसबाग तयार करुन भावी पिढी समृध्द व संपन्न घडवावी. याकामी शाळेतील शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद व प्रेरणादाई आहे.
शाळेचे मुख्याध्यापक प्रविण जाधव व उपशिक्षक सागर सुतार, सरपंच तानाजी फाळके, केंद्रप्रमुख अनिल कदम यांचा सत्कार आ. महेश शिंदे यांचे हस्ते झाला. प्रास्ताविक सरपंच तानाजी फाळके यांनी तर आभार दत्तात्रय फाळकेबुवा यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा. पुडंलिक नलावडे यांनी केले. कार्यक्रमास पोलिस पाटील सौ. शितल पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरख पाटील,तंटामुक्त समिती अध्यक्ष तेजस फाळके, उपसरपंच सुनिल फाळके, डॉ. आनंदराव भोसले, सागर मदने, हनमंतराव शिंदे, प्रविण जाधव, सागर सुतार, ताई फाळके, पुनम फाळके विविध गावचे पदाधिकारी तसेच ग्रामंस्थ हजर होते.