कोरेगाव भीमाकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे – कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दि. 1 जानेवारी रोजी लाखो नागरिक येतात. पुणे-नगर मार्गावरील पेरणे फाटा येथे होणाऱ्या गर्दीमुळे संभाव्य वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराकडून नगर रस्तामार्गे नगरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी दि. 31 डिसेंबर रात्री 9 वाजेपासून ते दि.1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा. अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्‍यक वाहनांना मात्र या मार्गावरुन सवलत देण्यात आली आहे.

1. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमार्गे नगरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी (पेरणे फाट्याकडे जाणाऱ्या वाहनांखेरीज) नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकातून हडपसर- सोलापूर रोड- केडगाव- चौफुलामार्गे-न्हावरा-शिरुरमार्गे नगरकडे जावे. तर येरवडा-विश्रांतवाडी-आळंदी-मरकळमार्गे शेल पिंपळगाव-शिक्रापूर-नगरकडे जावे.

2. सासवड, कात्रज बायपासकडून येणाऱ्या सर्व वाहनांनी हडपसर गाडीतळ पुलाखालून उजवीकडे वळून सोलापूर रस्त्याने मांजरी फाटा-लक्ष्मी कॉलनी (15 नंबर) चौकाकडे जावे. तर पुणे-सातारा मार्गाकडून येणाऱ्या वाहनांना हडपसर येथून सोलापूर महामार्गाद्वारे चौफुलामार्गे न्हावरा-शिरुरमार्गे नगरकडे जावे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.