भोर – शिंदे (ता. भोर) येथील तरुण कीर्तनकार उमेश महाराज शिंदे यांची अखिल वारकरी संघाच्या राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुखपदी तर जिल्हाध्यक्षपदी शिरवली येथील राजेंद्र महाराज शास्त्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ज्येष्ठ सल्लागार पंढरीनाथ भिलारे यांनी दिली.
श्रीसंत सणस बाबा सेवा संस्था धारांबे, रायरी (ता. भोर) येथे अखिल वारकरी संघाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी नामदेव महाराज किंद्रे, दिलीप अप्पा बाठे, ज्ञानेश्वर महाराज खराडे, पंढरीनाथ भिलारे, अमोल गोळे, कृष्णा लिम्हण, श्रीनाथ गाढवे यांसह संघाचे सभासद उपस्थित होते.
या बैठकीत भोर तालुकाध्यक्षपदी दत्तात्रयमहाराज गिरे, उपाध्यक्षपदी बापूमहाराज कंक, अशोकमहाराज गायकवाड, सुनीलमहाराज राजीवडे, शंकरमहाराज राऊत सचिवपदी जितेंद्रमहाराज बांदल यांना संधी देण्यात आली.