मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यासाठी देखील खास करून ओळखली जाते. शिल्पाचा पती राज कुंद्रामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जेलमधून सुटका झाल्यानंतर अनेकदा मीडियासमोर विविध प्रकारचे मास्क घालून येताना दिसतो. अनेकदा यावरुन त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. मात्र यावेळी राज कुंद्रा शिल्पाने देखील मास्क घातल्याचे पाहायला मिळाले आहे.
View this post on Instagram
शिल्पा आणि राज कुंद्राचा एक व्हिडओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नवऱ्याप्रमाणे काळ्या रंगाचा मास्क शिल्पाने घातला होता. मात्र शेवटी मास्क काढला. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “चुकीची कामं केल्यावर तोंड लपवण्याची वेळ येते”, “आता शिल्पा शेट्टी सुद्धा नवऱ्यासारखी वागते”, “नवऱ्याच्या चुकीच्या कृत्यांचं शिल्पा समर्थन करते”, अशा असंख्य कमेंट्स करत नेटकऱ्यांनी शिल्पा शेट्टीला ट्रोल केलं आहे.
दरम्यान, राज कुंद्रा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या UT 69 या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 2021 मध्ये पोर्नोग्राफीशी संबंधित कथित प्रकरणात अटक करण्यात आलेला राज कुंद्रा 3 नोव्हेंबरला त्याचा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. काही दिवसांपूर्वी फराह खान आणि मुनव्वर फारुकीसोबत त्याने याचे प्रमोशनही केले आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.