मुंबई – बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे सगळीकडे खळबळ माजवणारी जान्हवी सध्या आपल्या एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडिया सोबतच्या रिलेशनशिपमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
जान्हवी काही वर्षापूर्वी शिखर सोबत रिलेशनशिपमध्ये होती, मात्र त्यांचं ब्रेकअप झालं. आता शिखर जान्हवीसाठी एक्स बॉयफ्रेंड आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून ती शिखरसोबत फिरताना दिसत आहे. या दोघांना अनेक ठिकाणी सोबत स्पॉट देखील केलं गेलं आहे. दरम्यान, नुकताच जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
जान्हवीच्या या फोटोवर कमेंट करण्यापासून शिखर पहाडिया हा स्वत: ला रोखू शकला नाही. शिखर पहाडियाने तिच्या फोटोवर ‘हार्ट इमोजी’ शेअर करत आपल्या मनातली भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या अभिनेत्री जान्हवी कपूरचे हे बोल्ड फोटो सोशलवर धुमाकूळ घालत असून, फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहे.