इंटरनेट सेन्सेशन शेफाली जरीवालाचा नवरात्रीचा अंदाज व्हायरल

आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी शेफाली जरीवाला ही मॉडेल अर्थात अभिनेत्री सोशल मीडियामध्ये लोकप्रिय आहे मागील आठवड्यामध्ये तिने फ्लोरल स्विमिंग कॉस्ट्यूम मधील आपले फोटो इंस्टाग्राम सह सोशल मीडियामध्ये व्हायरल केले होते.

वर्ष 2001 मध्ये शेफाली जरीवाला चा काटा लगा हा म्युझिक अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता आणि रातोरात शेफाली चे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते तेव्हापासून शेफालीने मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

सध्या सुरु असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने शेफाली जरीवालाने आपले ट्रॅडिशनल लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहेत. “द पावर टू बि लिमिटलेस लाईज विथिन अस’ असे कॅप्शन तिने दिले असून केशरी लाल रंगाचा लहंगा आणि त्यावर ती त्रिकोणी कटचे ब्लाउज आणि पिवळी ओढणी, यासह हातात एक फॅन्सी पर्स असा तिचा लुक इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झाला आहे.

https://www.instagram.com/shefalijariwala/

या ड्रेसमुळे आपल्या मध्ये सकारात्मक ऊर्जा येत असल्याचे शेफालीने म्हटले आहे तर चाहत्यांनी तिच्या या ट्रेडिशनल लूकलाही नावाजले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.