मुंबई – शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप पसरला आहे. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आपला हा खोटा व्हिडीओ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनीच व्हायरल केल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. शीतल म्हात्रे आपल्या व्हिडिओत म्हणतात की “राजकारणामध्ये मला अनुभव आहे की पुरुषी जो विचार कसा असतो, एखादा पुरुष राजकारणातील स्त्री कसा वागवतो?
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? pic.twitter.com/rpaqbMtiZU
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 11, 2023
माझ्या आत्मसन्मानासाठी मी माझा जीव आणि करिअर पणाला लावलं. आज स्त्री ज्या पद्धतीनं काम करत असते ते खटकत असतं. एखाद्या स्त्री चांगल्या पद्धतीनं काम करु शकते त्यामुळं मग तिला अडकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार सुरु होतात, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणतात.., राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडिओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? व्हिडिओ टाकणं मनाला वेदना देणारं आहे. हे कुणी करतंय ते सर्वांना माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या भावासारखे असून, ते माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत.” असं त्या म्हणाल्या.