हैद्राबाद – एमसी स्टॅन हा एक प्रसिद्ध रॅपर आहे, आणि त्यामुळेच त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची वेगळीच क्रेझ आहे. चाहते नेहमीच स्टेनवर प्रेमाचा वर्षाव करतात. शुक्रवारी संध्याकाळी स्टेनच्या कॉन्सर्टमध्ये रॅपरला ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता, यावेळीही तसेच झाले. पण त्याच दरम्यान चाहत्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि शोच्या दरम्यान गोंधळ झाला.
It’s not every day that you get to Witness a Moment like this the aerial Drone view of MC Stan’s Hyderabad Concert is truly very Special 🔥🥹
With the massive 15K fans Vibing
Along to every beat giving it all To their Favorite rapper @MCStanOfficial.#MCStan #BB16 #BiggBoss16 pic.twitter.com/erWwp70WDX— 𝙈𝘾 𝙎𝙏𝘼𝙉 𝙊𝙁𝙁𝙄𝘾𝙄𝘼𝙇 𝙁𝘾⛓️ (@ItsTeamMCStan) March 11, 2023
रिअॅलिटी शो बिग बॉस 16 चे विजेते आणि देशातील सर्वात लोकप्रिय रॅपर्सपैकी एक, एमसी स्टॅनने अलीकडेच त्याच्या संगीत मैफिलीने गोंधळ घातला. हा कॉन्सर्ट हैदराबादमध्ये होता, या शोमध्ये स्टेनने आपल्या अप्रतिम कामगिरीने स्टेडियममध्ये उपस्थित 15 हजारांहून अधिक लोकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी चाहत्यांकडून स्टेनला भरभरून प्रेम दिले.
एमसी स्टॅन, त्याच्या स्वगमध्ये स्टेजवर आलायावेळी स्टेडियम पूर्णपणे भरलेले होते, ‘एक दिन प्यार’ त्याने गायला सुरुवात केली यादरम्यान स्टेडियम बाहेर उभे असलेल्या चाहत्यांनी आत जाण्यासाठी गेट तोडले, तसेच भांडण केले. स्टॅनला ऐकण्यासाठी त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. बॉटलही फेकल्या, स्टॅन स्टेजवर गात असताना गर्दीतून पाण्याची बाटली त्याच्यावर फेकण्यात आली. पाण्याची बाटली स्टॅनच्या बाजूला पडल्यामुळे त्याला ती लागली नाही किंवा कोणतीही दुखापत झाली नाही.
दरम्यान, एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर स्टनने हैदराबादमधील त्याचं कॉन्सर्ट काही वेळ थांबवल्याचेही बोलले जात आहे.
एमसी स्टॅनचा कॉन्सर्ट हा त्याच्या चालू असलेल्या ‘इंडिया टूर’चा एक भाग होता, जो 3 मार्च रोजी पुण्यात सुरू झाला होता आणि 7 मे रोजी दिल्लीत संपेल. ‘बस्ती के हस्ती’ एमसी स्टेनने अलीकडेच खुलासा केला की तो लवकरच आपल्या आई-वडिलांचे स्वप्न हजला घेऊन पूर्ण करणार आहे.