Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. बॉलीवूडची ही लोकप्रिय जोडी लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका आणि रणवीरच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. स्वत: दीपिका आणि रणवीरनेच त्यांच्या होणाऱ्या बाळाची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दीपिकाने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मागील काही दिवसांपासून दीपिका आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या सर्व अफवा असल्याचे समोर आले. यानंतर आता स्वत: दीपिकाने पोस्ट शेअर ती आई होणार असल्याची माहिती इनस्टाग्राम अकाऊंटवर अधिकृतरित्या सांगितली आहे. या पोस्टद्वारे दीपिका आणि रणवीरने सांगितले आहे की, त्यांच्या घरी 7 महिन्यांनंतर म्हणजेच सप्टेंबर 2024 मध्ये एका बाळाचा जन्म होणार आहे. या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
View this post on Instagram
या पोस्टनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह क्रिती सेनॉन, मनीष मल्होत्रा, मेधा शंकर, अंगद बेदी, मियांग चेंग, कुब्ब्रा सैत, मसाबा गुप्ता यांसारख्या अनेक स्टार्सनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, दीपिका आणि रणवीरने बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर वयाच्या 38 व्या वर्षी दीपिका आई होणार आहे.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच दीपिकाचा ‘फायटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याशिवाय तिच्याकडे ‘कल्की 2898 एडी, ‘सिंघम अगेन’ असे अनेक मोठे चित्रपट आहेत.