अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात निराशा; सेन्सेक्स कोसळला

मुंबई – अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या. मात्र, दीर्घ मुदतीचा भांडवली नफा (Long Term Capital Gain) याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे शेअर बाजारात निराशेचे वातावरण असून सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला. तर निफ्टी ३०० अंकांनी आपटला.

दरम्यान, अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात आज उघडताच २५० अंकांनी घसरून ४०,५०० स्तरावर पोहचला. निफ्टीही ६० अंकांनी घसरून ११,९०० स्तरावर पोहचला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.