पिरंगुट -माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे मुळशी तालुक्यात थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी सभापती महादेव कोंढरे यांनी दिली.
शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील प्रदेश कार्यालय येथे हा कार्यक्रम (व्हर्चुअल रॅली) होणार आहे. शनिवारी (दि. 12) सकाळी साडेदहा वाजता पिरंगुट येथील सुरभी बॅन्क्वेट हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रात रक्ताचा पुरवठा कमी आहे.
त्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती पांडुरंग ओझरकर यांनी केले आहे.