मुंबई – राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे केंद्रात सर्व कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. राज्य आणि केंद्रात सुरु असलेल्या या घडामोडींच्या दरम्यान शरद पवार यांनी एक ट्विट करत थेट गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आहे.
जंतर मंतर मैदानावर मागील काही दिवसांपासून कुस्तीपटू हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाप्रकरणी त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. मात्र या आंदोलकांवर पोलिसांनी ल;लाठीहल्ला केल्याचे समोर आले.
या आंदोलनाला समर्थन म्हणून दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनींनी मोर्चा काढला होता. यादरम्यान पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये राडा झाला. आता याच कारणावरून शरद पवार यांनी ट्विट करत थेट गृहमंत्र्यांना टॅग केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये पवार म्हणतात,”आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्या दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणींवर दिल्ली पोलिसांचे अन्यायकारक वर्तन दुःखद आणि अस्वस्थ करणारे आहे. शांततापूर्ण आंदोलनांवरील पोलिसांच्या क्रूरतेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि मी वैयक्तिकरित्या भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करतो”
Delhi police’s unjust behaviour towards the young women studying at Delhi University who took out a march in support of the agitating women wrestlers is sad and disturbing. Strongly Condemn the Police Brutalities on Peaceful Protests and I personally appeal to Honourable Home…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 4, 2023