Sharad Pawar On PM Modi| पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. याच मुद्दयावरून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दौंड येथील शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी मोदींच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. २०१४ मध्ये पेट्रोलचे दर ७१ रुपये प्रतिलिटर इतके होते. त्यावेळी महागाई कमी करु असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं.
मात्र अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलेली नाही. याउलट त्यात सातत्याने वाढ होत गेली आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर १०० ते १०६ रुपयांपर्यंत पोहचले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काय म्हणाले शरद पवार?Sharad Pawar On PM Modi|
“२०१४ ला मोदींनी राज्य हातात घेतलं आणि जाहीर केलं की ५० दिवसांच्या आत पेट्रोलचे दर मी ५० टक्के कमी करतो. आज त्यांची घोषणा होऊन ३ हजार ६५० दिवस झाले आहेत. या दिवसांमध्ये दर खाली आलेले नाहीत. २०१४ ला ७१ रुपये लिटर पेट्रोलचा दर होता. मोदींनी घोषणा करुन ५० टक्के दर कमी करतो सांगितले होते. त्यामुळे तो दर आता ३५ रुपये प्रति लिटर होणे अपेक्षित होते. पण आज पेट्रोलचा भाव काय? १०० ते १०६ रुपये लिटर आहे. याचा अर्थ शब्द दिला एक पण घडतंय दुसरंच.” असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना यांच्यावर निशाणा साधला.
“माझ्या बोटाची चिंता वाटू लागली” Sharad Pawar On PM Modi|
मोदी बारामतीला आले तेव्हा माध्यमांना म्हणाले होते की मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो. मला आता माझ्या बोटाची चिंता वाटू लागली आहे असं मिश्किल वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर आणि रामटेक या ठिकाणी सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका केली होती. जेव्हा मोदी महाराष्ट्रात भाषण करतात तेव्हा ते शरद पवारांचं नाव जरुर घेतात. यावरुनही शरद पवार यांनी त्यांना सुनावले.