पिरंगुट, (वार्ताहर) -शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापना करून अनेक नेते कार्यकर्ते घडविले. असंख्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन समाजाने देशहिताचे निर्णय घेतले. त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि ध्वज घेतला असला तरी शरद पवार हेच आमचे चिन्ह, ध्वज आणि तेच आमचा पक्ष आहे, असे प्रतिपादन मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केले.
घोटावडे (ता. मुळशी) येथील शेळकेवाडीतील जय सुचंद्रिका मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे चिन्ह, ध्वज व नाव निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुळशीतील शरद पवार गटाची पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना महादेव कोंढरे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे, कार्याध्यक्ष विलास अमराळे, युवक अध्यक्ष सागर साखरे, महिला अध्यक्षा दिपाली कोकरे, उपाध्यक्ष बाबाजी शेळके, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष प्रशांत रानवडे, भोर विधानसभा उपाध्यक्ष सुनील जाधव, संतोष गोडांबे, जनार्दन मातेरे, बाजीराव धुमाळ, निलेश भोईर, सोशल मीडिया अध्यक्ष गणेश पवळे, विद्यार्थी अध्यक्ष प्रसन्न ओझरकर, युवती अध्यक्ष नेहा साठे, शितल अमराळे आधी उपस्थित होते.
मुळशीतील सर्व पदाधिकारी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नव्या जोमाने पुन्हा पक्षाला वैभव प्राप्त करून देऊ, असेही महादेव कोंढरे यांनी सांगितले. घोटावडे (ता. मुळशी) :मुळशीतील शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक प्रसंगी उपस्थिती मान्यवर.