मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जाना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात. असा टोमणा सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एक खासगी कार्यक्रमात माध्यमांशी बोलतांना महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केली आहे.