पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, दरोडा, धमकावणे, प्राणघातक हल्ला, खून आणि बलात्कार आदी प्रकरणे येत असतात. लोक अशाप्रकारच्या तक्रारी घेऊन पोलिसांकडे जातात आणि पोलीस या तक्रारीवर काम करतात. पण कधी कधी पोलिसांकडेही अशीही प्रकरणे येतात की ते ऐकून पोलीस सुद्धा परेशान होतात.
नुकतेच कर्नाटक पोलिसांकडेही अशाच प्रकारची एक तक्रार समोर आली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या गायीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांकडे जातो. तो पोलिसांना सांगतो की त्याची गाय चार दिवसांपासून दूध देत नाही. त्यामुळे गायीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि पोलिसांनी कसे हाताळले ते जाणून घेऊया.
रिपोर्ट्सनुसार, हे रंजक प्रकरण कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील सिदलीपुरा गावातील आहे. या गावात राहणाऱ्या रामय्या या शेतकऱ्याने नुकतीच एक तक्रार घेऊन होलेहोन्नूर पोलिस ठाणे गाठले. रामय्याने आपली तक्रार पोलिसांना सांगितल्यावर पोलिस त्याची तक्रार ऐकून चक्रावून गेले. रोज चांगला चारा खायला देऊनही गेल्या 4 दिवसांपासून त्याची गाय दूध देत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
रामय्याने पोलिसांना सांगितले की, तो रोज सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेत गायीला चारा देतो. चारा खाऊनही गाय दूध देत नाही. जे चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही गायीला पोलिस ठाण्यात बोलावून समजावून सांगून दूध देण्यास प्रवृत्त करावे. अशी गायीविरुद्ध तक्रार या शेतकऱ्याने पोलिसांकडे केली आहे.
पोलिसांनी सर्वप्रथम त्या शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेतली. तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला समजावून सांगितले की, पोलिस अशा प्रकारची प्रकरणे सोडवत नाहीत तसेच अशी प्रकरणाचा गुन्हाही नोंदवता येत नाही. पोलिसांनी असी समजूत काढत या शेतकऱ्याला परत पाठवले.