मुंबई : नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन गुरुवारी पार पडत असून मनसेच्या नव्या ध्वजाचे अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेच्या ध्वजाचे भगवीकरण करण्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे डोके असल्याचा गंभीर आरोप गणेश हाके यांनी केला आहे.
शरद पवारांनी हिंदू मतांच्या राजकारणासाठी मनसेचा वापर केला. दुर्दैवाने शिवसेना हिरवी झाली म्हणून माणसे भगवी होत आहे. हिंदू धर्माच्या नावाखाली शरद पवार मनसेला साथ देत आहेत. मनसेच्या नव्या भूमिकेमुळे भाजपला काही फरक पडत नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान मनसे भाजप विचार जुळले तर भविष्यात मनसे सोबत युती कण्याचे संकेत भाजपतर्फे देण्यात आले आहे. तसे अमित ठाकरे यांच्या पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल हिंदुत्वाला बळकटी मिळेल असे भाजप नेते राम कदम यांनी सांगितले.