NCP SharadChandra Pawar Party Star Campaigners| देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे.
शरद पवार, अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक
लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. या यादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.
NCP-SCP issues a list of 40 star campaigners of the party for the upcoming Lok Sabha elections.
Party chief Shard Pawar, Supriya Sule, Jayant Patil, Anil Deshmukh, Jitendra Awhad, Rohit Pawar among the campaigners. pic.twitter.com/RSkRhT085e
— ANI (@ANI) April 2, 2024
शरद पवार गटाकडून पाच उमेदवार जाहीर
राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून सुप्रिया सुळे, नगरमधून निलेश लंके आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही.
हेही वाचा: