Baba Ramdev । पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणी आज सर्वोच्च नायायालयाने पुन्हा एकदा योगगुरू रामदेव बाबा यांना खडेबोल सुनावले आहेत. यावेळी न्यायालयाने पतंजलीला “तुम्ही इथे येऊन केवळ नावासाठी माफी मागत आहेत तसेच आता इथून पुढच्या कारवाईसाठी तयार राहा” अशा तिखट शब्दात नाराजी व्यक्त केलीय.
“आमचीच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागा” Baba Ramdev ।
सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना पतंजलीच्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सुनावली केली. यावेळी योगगुरू बाबा रामदेव न्यायालयात उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत आचार्य बाळकृष्ण हेदेखील हजर होते. दोघांनी यावेळी न्यायालयाची त्यांनी बिनशर्त माफी मागितली. मात्र त्यावर असमाधान व्यक्त करत तुमच्या दिलगिरीवर आम्ही अजिबात समाधानी नाही, आमचीच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागा” असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी
इंडियन मेडिकल असोसिएशनने नोव्हेंबर 2023 मध्ये पतंजली आयुर्वेदविरोधात केस दाखल केली होती. अॅलोपथी डॉक्टरांविरोधात जाणूनबुजून चुकीचे दावे पतंजलीनं आपल्या जाहिरातींमध्ये केले, असा आरोप IMAनं केला होता. याबाबत, पतंजलीनं तात्काळ सर्व जाहिराती थांबवाव्यात असे आदेश कोर्टानं फेूब्रुवारीमध्ये दिले होते. आता पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे.
न्यायालयाने बाबा रामदेव यांना फटकारले Baba Ramdev ।
बाबा रामदेव यांच्या वकिलाने सांगितले की, रामदेव यांना वैयक्तिकरित्या हजर राहून माफी मागायची आहे. त्यावर कोर्ट म्हणाले की, प्रतिज्ञापत्र आधी यायला हवे होते. कोर्टाला विचारून प्रतिज्ञापत्र लिहिणार का? न्यायालयाने ही वृत्ती अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. 21 नोव्हेंबर रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊनही पतंजलीने दिशाभूल करणारी जाहिरात दिली यावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला.
तसेच सर्वोच्च न्यायालयानं रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सांगितलं की, तुम्हाला कोर्टात दिलेलं वचन पाळावं लागेल, तुम्ही प्रत्येक मर्यादा मोडली आहे.
रामदेव यांच्या वकिलाने सांगितले की, त्यांना यातून धडा मिळाला आहे. आमच्या बाजूने अवमानाची कारवाई झाल्यानंतरच धडा घेतला जाईल. त्याचवेळी केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हस्तक्षेप करत वकिलांशी बोलून योग्य प्रतिज्ञापत्र दाखल करून घेणार असल्याचे सांगितले.