Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी ५ जानेवारी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद मोहोळ गेल्यावर अवघ्या आठ तासांमध्ये पोलिसांनी या गुन्ह्यातील आठ आरोपींना गजाआड केलं.
शरद मोहोळची ज्या कोथरुडमध्ये दहशत होती तिथेच भर दिवसा गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. कोथरुडच्या सुतारदरा भागातील याच ठिकाणी शरद मोहोळवर गोळीबार झाला. दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मोहोळवर चार गोळ्या झाडल्या, यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. त्याला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुढे ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषीत करण्यात आलं.
दरम्यान, पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सापळा कसा रचला याबद्दल सविस्तर सांगितलं आहे.
गुन्हा केल्यानंतर आरोपी चारचाकी वाहनातून पळून गेले होते. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिसांना आरोपी मुंबई -बंगळुर हायवेने साताऱ्याच्या दिशेने गेल्याचे दिसले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ज्या चारचाकीने जात होते.
त्या कारला पोलिसांनी ट्रक केले. त्यानंतर ते खेड शिवापूर टोलनाका पास होवून पुढे जात असल्याची माहीती प्राप्त झाली. नंतर पोलीस आरोपीच्या शोधाकरीता तात्काळ साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले.
पोलीस अधिक्षक सातारा यांच्याशी संपर्क साधून पुणे पोलिसांनी सातारा मार्गावर व शिरवळ, आणेवाडी टोलनाका, महाबळेश्वर फाटा, वाई परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती.
त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध घेत असताना पुणे सातारा रोडवर किकवी जवळ तपासात निष्पन्न झालेली संशयित स्विफ्ट गाडी पोलिसांना दिसली. या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला. या गाडीतून आरोपींना अटक केली.
पोलिसांनी या प्रकरणात कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुरजि.नं. २/२०२४ भा. द. वि. कलम ३०२, ३०७, ३४ आर्म अॅक्ट कलम ३/७ (२५), महा पोलीस अधिनियमचे कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.