मुंबई – बॉलीवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी ‘शनाया कपूर’ ही स्टार किड्सपैकी एक असून ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. शनाया सतत कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे चर्चेत आणि प्रसिद्धिच्या झोतात असते. ग्लॅमर्स लूक आणि बोल्ड अंदाजामुळे शनायाचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.
शनाया कपूर लवकरच करण जोहरच्या आगामी ‘बेधडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणाऱ्या शनाया कपूरनं नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. या मध्ये तिने ग्रीन रंगातील ब्लॅक वन पीस परिधान केला असून, यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
फॅन्स देखील तिच्या या लूकवर प्रचंड फिदा झाले असून, लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या शनायाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, शनाया कपूरला डान्सची प्रचंड आवड असून, ती नेहमीच आपले डान्सचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.