मुंबई – कास्टिंग काउचचे किस्से एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अनेकदा चर्चेत येतात. आता अभिनेत्री शमा सिकंदरने तिचा अनुभव शेअर केला आहे. शमाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘काही प्रसिद्ध निर्माते आणि निर्मात्यांना तिच्याशी मैत्री करायची होती. कामाच्या मोबदल्यात सेक्शुअल फेवर मागणे हे अत्यंत चुकीचे कृत्य असल्याचे शमा म्हणाली.
View this post on Instagram
शमा सिकंदर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिने ये मेरी लाइफ है, मन में है विश्वास आणि सीआयडी सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने कास्टिंग काउचवर भाष्य केले आहे. बॉलीवूड लाइफशी संवाद साधताना शमा म्हणाली, ‘इंडस्ट्री खूप बदलली आहे. काही निर्मात्यांनी माझ्याशी चुकीच्या पद्धतीने मैत्री करण्याचा प्रयत्न केला. जर आपण एकत्र कामच करत नाही तर मैत्री कशी करू शकतो असा विचार मी करायचे. सत्य पाहता कामाच्या मोबदल्यामध्ये त्यांचा सेक्स हा एकच उद्देश होता.”
View this post on Instagram
मात्र, बॉलिवूडपुरताच हे मर्यादित नव्हे तर सगळ्याच ठिकाणी अशा वृत्तीचे लोक आहेत असं शमाने यावेळी सांगितलं. शिवाय ती म्हणाली, “कलाक्षेत्रात असेही काही लोक आहेत ज्यांच्यामुळे काम करताना मला सुरक्षित वाटलं. म्हणून संपूर्ण कलाक्षेत्रामध्ये विचित्र लोक आहेत असं बोलता येणार नाही.” शमाने नव्या पिढीतील निर्मात्यांचं कौतुक केलं.