लखनऊ : काही दिवसांपूर्वी एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने मालकिणीला जिवंत ठार केल्याची घटना केली घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. या घटनेला काही महिने उलटले नाहीत तोपर्यंत अशीच एक घटना उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पिटबुलने तरुण मुलावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
ही घटना लखनऊमधील गोमतीनगर विरामखंड दोन येथील पार्कमध्ये घडली आहे. तिथे एक तरुण आपल्या आईसोबत फिरत होता. त्यादरम्यान, कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. या तरुणाला वाचवताना त्याची आईही जखमी झाली आहे. या प्रकरणी तरुणाने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.
याबाबत जखमी प्रांजल मिश्रा यांनी याविषयी माहिती दिली. “मी माझ्या आईसोबत शनिवारी रात्री सुमारे साडे दहा वाजता जेवून पार्कमध्ये फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका ८-९ वर्षांच्या मुलासह एक १७ वर्षांचा मुलगा कुत्र्याला फिरण्यासाठी घेऊन आला होता. मी त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने माझ्या हाताचा चावा घेतला. आईने हे पाहिले तेव्हा ती मला वाचवण्यासाठी धावत आली. मात्र ती मध्येच घसरून पडली. एवढ्यामध्ये कुत्र्याने माःझ्या हाताचा चावा घेतला. तेवढ्यात तिथे कुत्र्याला फिरवत असलेले दोन्ही तरुण तिथून पसार झाले.
या प्रकरणी गोमतीनगरचे इन्स्पेक्टर दिनेश मिश्रा यांनी, पीडित प्रांजल मिश्रा यांच्याकडून अज्ञातांविरोधात तक्रार देण्यात असून गुन्हा दाखल करण्यात आला. आता पिटबुलच्या मालकाचा शोध सुरू आहे. लवकरच या प्रकरणाची पुढील तपास सुरू आहे.