महाबळेश्वर -महाबळेश्वर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसींदिवस वाढत आहे. सोमवारी (दि. 1) सायंकाळी आणखी आठ बाधित रुग्ण आढळल्याने तालुका पुन्हा हादरला आहे.
तालुक्यातील हरचंदी येथील 53 वर्षांची महिला, 36 वर्षांचा पुरुष व 63 वर्षांची महिला, गोरोशीतील 72 वर्षांची महिला, कासवंड येथील 12 वर्षांची मुलगी, 39 वर्षांची महिला, 62 वर्षांची महिला, कोट्रोशीतील 10 वर्षांची मुलगी, अशा एकूण आठ जणांचे रिपोर्ट एकाच दिवसात पॉझिटिव्ह आले.
गोळेवाडी (कासवंड) येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 15 जणांना करोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील 12 वर्षांची मुलगी, 39 वर्षांची महिला, 62 वर्षांची महिला यांना करोनाची बाधा झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतून हरचंदी येथे आलेल्या 36 वर्षांच्या पुरुषाचा रिपोर्ट रात्री पॉझिटिव्ह आला आहे. आता तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 24 झाली आहे. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू तर एक रुग्ण कोव्हिडमुक्त झाला आहे. 24 जणांवर ठिकठिकाणी उपचार सुरू आहेत.