बेंगळुरू – ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कर्नाटकात भाजपला पुन्हा धक्का बसला आहे. भाजपचे दोन माजी आमदार, मलिकय्या गुट्टेदार आणि शारदा मोहन शेट्टी यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Former BJP MLAs Malikayya Guttedar And Sharada Shetty join Congress)
गुट्टेदार हे कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूरचे सहा वेळा आमदार आणि माजी मंत्री आहेत. कलबुर्गी हा काँग्रेसचे अध्यक्ष एम मल्लिकार्जुन खर्गे यांचा गृह जिल्हा आहे. खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी हे आगामी लोकसभा निवडणुकीत कलबुर्गी (गुलबर्गा) येथून निवडणूक लढवत आहेत. मलिकय्या, पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर भाजपमध्ये सामील झाले होते.
कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री आणि खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शारदा मोहन शेट्टी २०१३ ते २०१८ या काळात उत्तरा कन्नड जिल्ह्यातील कुमटा येथील काँग्रेसच्या आमदार होत्या.
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांचे डीके शिवकुमार, प्रियांक खर्गे यांनी दोन्ही नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले.