Entertainment : बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा बहूचर्चित ‘डंकी’ सिनेमा आज रिलीज झाला. शाहरुखच्या ‘डंकी’साठी चाहतेही उत्सुक होते. किंग खानने ‘डंकी’ सिनेमाचं जोरदार प्रमोशनही केलं होतं. पठाण, जवान चित्रपटाच्या यशानंतर डंकीच्या माध्यमातून एक वेगळी स्टोरी प्रेक्षकांना पहायला मिळणार अशी अपेक्षा केली जात होती. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी डंकी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नेटकऱ्यांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींना हा सिनेमा कमाल वाटला, तर अनेकजण हा सिनेमा पाहिल्यानंतर निराश झाले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानपेक्षा जास्त विकी कौशलची चर्चा होत आहे. प्रेक्षकांकडून विकीच्या अभिनयाचे खुपच कौतुक होत आहे.
शाहरुखने खूप निराश केली असल्याचे काहींनी सांगितले. “चित्रपटात विकी कौशलचे काम चांगले आहे. राजकुमार हिरानी यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र मी निराश झालो आहे,” असेही एका चाहत्याकडून सांगण्यात आले. मात्र पुढील काही दिवसांत चित्रपट आपली दमदार कामगिरी दाखवेल असे म्हंटले जात आहे. दरम्यान, राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटात शाहरुख खान अभिनेत्री तापसी पन्नूसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून 15 कोटींची कमाई केली आहे. आता रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘डंकी’ भारतात जवळपास 45 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.