Entertainment : बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डाने काही दिवसांपूर्वीच लीन लैश्रामसोबत विवाह केला. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. लग्नानंतर रणदीप पत्नी लिन लैश्रामच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. रणदीप हुड्डाने या पोस्टद्वारे पत्नीला वाढदिवसाच्या मजेशीर अंदाजात शुभेच्छा दिल्या.
रणदीपने इनस्टाग्रामवर लिन लैश्रामसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो हा मुंबई रिसेप्शनमधील आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रणदीप आणि लिन बाईकवर बसलेले दिसत आहेत. रणदीपने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ बरं झालं पळून जावं लागलं नाही. हायवेपासून इथपर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा मिसेस. तू माझ्या आयुष्यात आहेस आणि आवश्यक असलेली स्थिरता आणि शांतता देतेस, यासाठी मी स्व:ताला भाग्यवान समजतो. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे’. या पोस्टवर लिनने देखील ‘लव्ह यू मोर’ अशी कमेंट केली आहे. सध्या त्याच्या या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, लिन ही मणिपूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. . तिने प्रियांका चोप्राच्या ‘मेरी कॉम’ या सिनेमात काम केलं आहे. रणदीपची बायको ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. रणदीप हुड्डा 47 वर्षांचा आहे, तर लिन लैशराम 37 वर्षांची आहे. रणदीप हुड्डा यांनी 2021 साली लिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोघे 2023मध्ये विवाह बंधनात अडकले. रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’मध्ये दिसणार आहे.