मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर चाहते शाहरुखच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखचे ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 7 सप्टेंबर 2023 रोजी ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे.
जवानचा दुसरा ट्रेलर 31 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिलीज होण्याआधी शाहरुख खानने माँ वैष्णोदेवीच्या दरबारात जाऊन दर्शन घेत आहे. सध्या शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख कडेकोट बंदोबस्तात दिसत आहे.
कोणाला कळू नये म्हणून त्याने आपला चेहरा झाकून घेतला आहे. शाहरुख रुंद टी-शर्ट, निळा जॅकेट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. शाहरुखने आपले डोके जॅकेटने झाकले असून मुखवटाने चेहरा झाकला आहे. त्यामुळे त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे.
SRK visits Vaishno Devi prior to Jawan release
Ek hi dil hai khan shab @iamsrk kitni bar jeeto ge
pic.twitter.com/TAksjnPCxz— ᴴⁱⁿᵈᵘ ˢʰᵉʳ🚩 (@iYashh1) August 30, 2023
शाहरुख खानचे चाहते त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. शाहरुखच्या फॅन पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना एका चाहत्याने लिहिले, ‘जवान’च्या रिलीजपूर्वी शाहरुख खान माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेला होता…’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.