आज रक्षाबंधन देशभरात उत्साहात साजरे होत आहे. पुण्यात देखील अनोख्या पद्धतीने आज रक्षाबंधन साजरे करण्यात आले आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवणारे, पुणेकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे स्वच्छचे सेवक, अर्थातच शहरातील कचरावेचकांनी शहरातींल नागरिकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले आहे, यामध्ये कचरावेचकांनी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वच्छताप्रेमी, नागरिक, कचरा वेचकांच्या हक्कांसाठी पुढाकार घेणारे पुणेकर यांच्यासोबत आपली बांधिलकी व्यक्त करून रक्षाबंधन साजरे केले.