अभिनेत्री शहनाज कौर गिल, हे नाव आज संपूर्ण मनोरंजन उद्योगाला परिचित आहे. पंजाबची कतरिना ते मुंबईची शहनाज गिल बनण्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या पंजाबी गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिलच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वांनाच माहिती आहे.
View this post on Instagram
शहनाज नेहमीच सोशल मीडियावर आपल्या क्युट अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. अलीकडेच, शहनाजने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर (शहनाज गिल इन्स्टाग्राम) तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ते पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
होय, तिच्या जबरदस्त फॅट तो फिट बॉडी ट्रान्सफमेशनने शहनाज अनेकदा तिचे हॉट लूक चाहत्यांसोबत शेअर करते. शहनाजने बिग बॉसच्या घरात तिच्या क्यूटनेसने संपूर्ण भारताची मने जिंकली होती.
नुकताच व्हायरल झालेला शहनाज गिलचा हा फोटो तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. सोशल मीडियावर शहनाजची ही स्टाईल चाहत्यांना आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
शहनाजच्य स्विमिंग करतानाचा लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. शहनाज पहिल्यांदाच स्विम सूटमध्ये दिसली आहे. त्यामुळेच तिचे हे फोटो इंटरनेटवर ट्रेंड करत आहे.
यासोबतच शहनाजच्या स्क्रीन प्रेझेन्सचेही लोक कौतुक करतात आहे. शहनाज गिलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्विमसूटमधील सिझलिंग फोटो अपलोड केले आहेत. जे पाहून सर्वांच्या हृदयाचे ठोके थांबले आहेत.
देसी स्टाईलसोबतच शहनाज तिच्या हटके स्टाइलने सोशल मीडियावर आपल्या फॅन्सच्या मनात वेगळी जागा निर्माण करते.