मुंबई – अभिनेता शाहरुख खान ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता त्याचा जवान चित्रपट देखील सुपरहिट होणार असल्याचे म्हंटले जात आहे.
शाहरूखप्रमाणे त्याची लेक सुहानाने देखील बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. ती ओटीटीवरून ‘द आर्चीज’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र आता शाहरूख-सुहाना म्हणजेच ही बाप-लेकीची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
‘कहानी 2’ आणि ‘बदला’चे दिग्दर्शक सुजॉय घोष हे एक चित्रपट घेऊन येणार आहेत. त्या चित्रपटात सुहाना आणि शाहरुख दोघेही एकत्र दिसणार आहे. एका वृत्तवाहिनेनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात शाहरुख खानची महत्त्वाची भूमिका असणार आहे. यात शाहरुख आणि सुहाना या दोघांचे देखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहे.
शाहरुखची भूमिका ही ‘डियर जिंदगी’ या चित्रपटातील भूमिकेप्रमाणे असेल. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख सुजॉय घोष यांच्या या आगमी चित्रपटात सुहानाच्या भूमिकेला पाठिंबा देणारी भूमिका असणार आहे. शाहरुख या चित्रपटात सुहानाच्या हॅन्डलरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनला सुरुवात झाल्याचे देखील म्हटले जात आहे.
दरम्यान, शाहरुखचा येत्या 7 सप्टेंबर 2023 रोजी ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे.