मुंबई – सध्या बॉलिवूड किंग शाहरुख खान चांगलाच चर्चेत आहे. यावेळी चर्चेत येण्याचं कारण आहे त्याचा आगामी चित्रपट जवान. जवान या चित्रपटासाठी कथेची चोरी करण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला होता. या चित्रपटाद्वारे शाहरुख बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या आधी तो २०१८ मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्रम्हास्त्रमध्ये त्याने छोटी भूमिका केली होती.
आता ‘जवान’ चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. कथेची कॉपी केल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यांवर करण्यात आला आहे. चित्रपट निर्माते मणिकम नारायणन यांनीही याप्रकरणी तमिळ चित्रपट निर्माता परिषदेकडे (TFPC) तक्रार दाखल केली आहे. निर्मात्याचा आरोप आहे की जवान चित्रपटाची कथा 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या पररासू या चित्रपटासारखी आहे.
शाहरुख खानचा जवान हा चित्रपट प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक एटली दिग्दर्शित करत आहेत. एटलीही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून पुढील वर्षी जूनपर्यंत तो प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्माते मेनिकम नारायणन यांनी तामिळ चित्रपट निर्माता परिषदेकडे (TFPC) तक्रार दाखल केली असून जवानच्या निर्मात्यांविरुद्ध चोरीचा आरोप केला आहे.