मुंबई – अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूपच व्यस्त आहे. असे असले तरी सिद्धार्थ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. यामुळे चाहत्यांना देखील सिद्धार्थच्या नव्या प्रोजेक्टबाबत अपडेट मिळत असतात. सिद्धार्थने नुकताच आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
सिद्धार्थ जाधवने मुलगी इरासोबतचा एक फोटो नुकताच शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने आणि त्याच्या लेकीने पिवळ्या रंगाचे टीशर्ट घातले आहे. यावेळी छोटी इरा एखाद्या मोठ्या काकूंप्रमाणे डोक्याला स्कार्फ गुंढाळून गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. सिद्धार्थने फोटो पोस्ट करत भन्नाट कॅप्शन दिले आहे,”चिते की चाल.. और इरा कि नजर पर कभी संदेह नही करते….” विशेष म्हणजे यावेळी सिद्धूने दोन कॉन्टेन्ट क्रिएटर्सना देखील टॅग केले आहे. हे क्रिएटर वहिनीच्या रूपात व्हिडीओ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणून सिद्धार्थाने देखील यावेळी आपल्या मुलीचा ‘आल्या जाधव वहिनी’ असा उल्लेख केला आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थ सध्या विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी या दाक्षिणात्य सुपरस्टार्ससह ‘गांधी टॉक्स’ या सायलेंट चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच पुढच्याच महिन्यात त्याचा ‘बालभारती’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीच्या आगामी सर्कस या सिनेमात देखील तो झळकणार आहे.