मुंबई – हृतिकबरोबर 2019 च्या “वॉर’मध्ये जबरदस्त ऍक्शन सीन केल्यानंतर टायगर श्रॉफ पुन्हाएकदा ऍक्शन पॅक्ड रोल करतो आहे. “गणपत- पार्ट 1′ मध्ये पुन्हाएकदा टायगर श्रॉफच्या ऍक्शनचा जलवा बघायला मिळणार आहे.
मात्र “गणपत- पार्ट 1′ च्या शूटिंगच्यावेळी तो जखमी झाला आहे. त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. टायगरने एक फोटो शेअर केला आहे. त्यात डोळ्याजवळ झालेली छोटी जखम दिसते आहे. “गणपत’चे काऊंटडाऊन सुरू असताना ही छोटी जखम झाली आहे, असे टायगरने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
“गणपत’च्या ब्रिटनमधील शेड्युल पूर्वीच जाहीर झाले आहे. 2022 मध्ये “गणपत- पार्ट 1′ रिलीज होणार आहे. त्या दृष्टीने हे शेड्युल महत्त्वाचे असणार आहे. टायगर श्रॉफ नेहमीच आपले ऍक्शन सीन स्वतःच करत असतो. सर्व स्टंटही त्याला स्वतःच करायला आवडतात.
या सिनेमाच्या तयारीसाठी फाईट मास्टरबरोबर केलेल्या फाईट सीनच्या रिहर्सलचा एक व्हिडिओ देखील टायगरने शेअर केला आहे. त्यात तो हवेत उडी मारून 2-3 गिरक्या घेत व्हलनच्या पोटात एकदम 2-3 लाथा मारताना दिसतो आहे.