तिरुपती –आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे शनिवारी रात्री झालेल्या एका भीषण बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात तिरुपतीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बाकरपेटा येथे झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस खडकावरून दरीत कोसळल्याचे ही दुर्घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. बस खोल दरीत कोसळल्यामुळे रविवारी पहाटे पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाने सात मृत आणि 45 जखमी लोकांना बाहेर काढले आहे.
#APPolice Rescue Operation :
Upon receiving information about the ghastly Bus accident at Bhakarapet ghat road, #Tirupati Urban SP, Ch. Venkatappala Naidu, IPS along with his team immediately rushed to the spot, rescued & shifted the passengers to SVRRGG Hospital, Tirupati pic.twitter.com/0bh0Ex0Hu4— Andhra Pradesh Police (@APPOLICE100) March 27, 2022
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसमधील प्रवासी लग्न समारंभासाठी जात असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती तिरुपती विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना दुसऱया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.