पणजी – डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री होण्याचा दुसऱ्यांदा बहुमान त्यांना मिळाला आहे. सावंत यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने चांगल यश मिळवलं आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, मणिपूर गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपने सत्ता टिकवण्यात यश मिळवलं आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह 9 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये महिलांना देखील मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या भव्य दिव्य सोहळ्याचे आकर्षण असणार होते. त्यांच्याबरोबरच 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
मंत्रीपदाची शपथ घेतलेले आमदार
1) विश्वजीत राणे
2) माविन गुदिन्हो
3) रवी नाईक
4) रोहन खंवटे
5) गोविंद गावडे
6) बाबूश मोन्सेरात
7) सुभाष शिरोडकर
8) नीलेश काब्राल
PM Shri Narendra Modi attends Swearing-in Ceremony of Goa CM & Council of Ministers https://t.co/jhEgCXv2eC
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 28, 2022
भाजपनं 40 पैकी 20 जागा जिंकल्या
गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. यामध्ये 20 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच भाजपने गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या ( MGP) 2 आमदारांनी आणि तीन अपक्ष आमदारांना पाठिंब्याची पत्रे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना सुपूर्द केली आहेत. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पुढील सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते.
प्रमोद सावंतांचा राजकीय प्रवास
– डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द कोल्हापुरातून सुरु झाली
-वैद्यकीय \महाविद्यालयाच्या सरचिटणीस (GS) पदाची निवडणूक जिंकली
– 2012 मध्ये पहिल्यांदा गोव्यातील साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले
– पुढे दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले
-गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची
पहिल्यांदा 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती