पुणे – लष्करी सेवेतील आजी-माजी अधिकारी व जवानांना टपाल कार्यालयात सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी टपाल विभागातर्फे पुणे स्टेशन येथील टपाल कार्यालयात (जीपीओ) जवानांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू केले आहे. या माध्यमातून लष्करी अधिकारी व जवानांना तत्काळ सेवा उपलब्ध होणार आहे.
याबाबत वरिष्ठ पोस्टमास्तर बी. के. एरंडे म्हणाले, लष्करी सेवेतील व्यक्तींसाठी जीपीओमध्ये स्वतंत्र काउंटर सुरू झाले आहे. टपाल खात्याच्या बचत खात्यापासून अन्य योजनांसंबंधीची कामे व माहिती या काउंटरद्वारे लष्करातील व्यक्तींना देण्यात येईल. त्यामुळे त्यांचा वेळ वाचेल.