अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदी लॉयड ऑस्टिन यांची निवड; रचला हा इतिहास

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदी लॉयड ऑस्टिन यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्‍तीवर सिनेटने शिक्कामोर्तब केले आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदावर दाखल झालेले ते पहिलेच कृष्णवर्णीय अमेरिकन नेते आहेत.

अध्यक्ष जो बायडेन यांची त्यांच्या नियुक्‍तीचा प्रस्ताव ठेवला होता तो 93 विरूद्ध 2 मतांनी संमत झाला. उपाध्यक्ष कमला हॅरीस त्यांना पुढील आठवड्यात समारंभ पूर्वक शपथ देणार आहेत.

ऑस्टिन यांच्या नियुक्‍तीवर शिक्कामोर्तब केल्याबद्दल अध्यक्ष बायडेन यांनी सिनेटचे आभार मानले आहेत. ऑस्टिन हे अमेरिकन लष्करातील जनरल दर्जाचे निवृत्त अधिकारी आहेत.

तथापि अमेरिकेतील नियमानुसार एखादा लष्करी अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्याला सरकार मध्ये संरक्षण मंत्री किंवा अन्य महत्त्वाचे पद भूषवायचे असेल तर त्याच्या निवृत्तीला किमान सात वर्षांचा अवधी झालेला असावा ही अट असते. पण ऑस्टिन यांना त्या अटीतून सवलत देण्यात आली आहे.

त्यांच्या या सवलतीचा प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हमध्ये 326 विरुद्ध 78 आणि सिनेटमध्ये 69 विरुद्ध 27 अशा मतांनी संमत झाला आहे. या आधीचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनाही अशी सवलत मिळाली होती. ट्रम्प यांनी माजी जनरल जेमस्ट मॅटिन यांची जानेवारी 2017 मध्ये संरक्षणमंत्रपदावर नियुक्‍ती केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.