पुणे – मुरूम (जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी सुत्रय्या रूद्रय्या स्वामी (केसरजवळगेकर) यांची केंद्रीय जल तथा विद्युत अनुसंधान शाला खडकवासला, पुणे (सीडब्ल्यूपीआरएस) येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. यानिमित्त सोलापूर येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक धनेश स्वामी जवळेकर परिवाराच्या वत्तीने मोगलय्या गुरय्या स्वामी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सत्कार समारंभ व आर्ट ऑफ लिव्हिंग सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सुत्रय्या स्वामींना सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी आणि आयएमएसचे संस्थापक ए. डी. जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. इरेश स्वामी आणि ए. डी. जोशी, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी सुत्रय्या स्वामी यांचे अभिनंदन केले. सुत्रय्या स्वामींनी मार्गदर्शन करताना “युवापिढीने
आयुष्यभर स्वयंस्फूर्तीने प्रामाणिक कष्ट करावे, यश नक्की मिळते,’ असे सांगितले. सुत्रय्या स्वामी हे तत्कालिन राज्यपत्रित मुख्याध्यापक रूद्रय्या स्वामी यांचे व्दितीय सुपुत्र आहेत.
यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे रघुराज चव्हाण आणि मित्रमंडळींनी मोगलय्या गुरय्या स्वामी यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. सूत्रसंचलन सुनील स्वामींनी, तर आभार कृष्णा हिरेमठ यांनी मानले.