कंगना राणावत अडचणीत ; मुंबई पोलिसांकडून होणार कसून चौकशी

मुंबई – कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांवरून चर्चेत असते. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणले आहेत. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा ती अडचणीत सापडली आहे. गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी मुंबई पोलिसांकडे  मानहानीची तक्रार केली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, कंगनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा समन्स जारी केला आहे.  या प्रकरणात कंगनाची चौकशी होणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यावेळी कंगनाने अनेक कलाकारांवर ट्विट करत आरोप केले होते. तेव्हापासून  जावेद अख्तर यांनी कंगना राणावत यांच्यात शाब्दिक चकमक सुरु असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी  जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जुहू पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत आणि त्यासाठीच आता कंगनाची चौकशी केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.