नगर -मनपाच्या स्थायी समितीच्या रिक्त आठ जागांसाठी आज दुपारी ऑनलाइन महासभा घेण्यात आली. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस तीन, शिवसेना भाजप प्रत्येकी दोन, कॉंग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. दरम्यान, भाजपचे मनोज कोतकर यांची दुसऱ्यांदा स्थायी समितीत निवड झाली आहे. 31 जानेवारीला ते स्थायी समितीतून निवृत्त झाले होते.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, नगर सचिव एस.बी. तडवी, सभागृहनेता स्वप्निल शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मालन ढोणे, संपत बारस्कर, रोहिणी शेंडगे, सुप्रिया जाधव या गटनेत्यांनी स्थायी समिती सदस्यसाठी पक्षीय कोठयानुसार महापौर यांच्याकडे बंद पाकिटात नावे दिली.
त्यानुसार ही निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस सागर बोरूडे, परवीन कुरेशी, प्रकाश भागानगरे, शिवसेना शाम नळकांडे, विजय पठारे, भाजप मनोज कोतकर, सोनाबाई शिंदे, कॉंग्रेस सुप्रिया जाधव यांची निवड करण्यात आली आहे.