2012मध्ये प्रसारित झालेल्या ‘देवयानी’ या मालिकेतुन घरोघरी घरी पोहोचलेल्या अभिनेत्री ‘शिवानी सुर्वेला’, आजही कोणी विसरू शकत नाही. तिने स्टार प्रवाह वरील देवयानी या मालिकेत सोज्वल, सुंदर आणि आदर्श सुनेची भूमिका साकारली होती.
देवयानी मालिकेनंतर 2013 मध्ये शिवानी ‘अनामिका’ या मालिकेतही ती झळकली. म्हणजेच हिंदी, मराठी दोन्ही मालिकांच्या क्षेत्रात तिने आपले नाव कमावले आहे. शिवानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते.
आपल्या सुंदर आणि सोज्वल स्वभावाने सर्वांना भूरळ घालणारी शिवानी ख-या आयुष्यातही तेवढीच चुलबुली आणि ग्लॅमर्स आहे. नुकतंच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर असून, यात शिवणी अतिशय सुंदर दिसून येते आहे. शिवणीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून आहे.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागात सर्वाधिक चर्चेत अभिनेत्री ‘शिवानी सुर्वे’ हिने प्रथमच आपल्या पडद्यामागची कथा मांडली आहे. एकेकाळी एका वेळच्या जेवणास महाग असणाऱ्या देवयानी हिने चार चाकी गाडी ते समुद्रापासून 15 मिनिटे अंतरावर असणारे घर घेऊन आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवास तिने ‘बिग बॉस’ मध्ये मांडला.