मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘सोनू सूद’ लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे. आता यातच बिग बी अमिताभ बच्चन हे देखील स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईत अडकलेल्या जवळपास 700 मजुरांना अमिताभ बच्चन यांनी विशेष विमानाने त्यांच्या घरी उत्तर प्रदेशमध्ये पाठवलंय.अडकलेल्या मजुरांसाठी अमिताभ बच्चन यांनी अजून दोन विमानांचीही व्यवस्था केली असून गुरूवारी ही विमानं उत्तर प्रदेशसाठी उड्डाण घेतील अशी माहिती आहे.
View this post on Instagram
बुधवारी सकाळी मुंबईहून चार विमानांनी गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी उड्डाण घेतलं. प्रत्येक विमानात 180 प्रवासी होते. यापूर्वी गेल्या आठवड्यात बच्चन यांनी 1500 मजुरांना बसेसची व्यवस्था करुन घरी पाठवले होते. या बसेसने उत्तर प्रदेशातील लखनऊ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोही आदी जिल्ह्यांशी संबंधित जवळपास 1500 मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते.