पहा ‘पती पत्नी और वो’च्या सेटवरील कार्तिकचा लूक

अभिनेता कार्तिक आर्यनने नुकताच इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. आता कार्तिक त्याचा आगमी चित्रपट ‘पती पत्नी और वो’च्या चित्रीकरणासाठी लखनऊला रवाना झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान कार्तिकसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

नुकताच या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कार्तिक एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. त्याने फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. दरम्यान तो एका खिडकीबाहेर उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्तिकचा हा वेगळा अंदाज पाहून चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झालेल्या पती,पत्नी और वो चित्रपटाचा रिमेक असणार आहे. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असून त्याला विनोदाची किनार होती. या कारणास्तव हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने मुदस्सर अजीज यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.