सातारा -करोनाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या “व्हायरस मराठी लॉकडाऊन’ ऑनलाइन चित्रपट महोत्सवात सातारच्या कलाकारांची निर्मिती असलेल्या “थेंब’ या डॉक्युड्रामाला दुसरे पारितोषिक मिळाले.
या महोत्सवातील डॉक्युड्रामा विभागात महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील 305 लघुपट सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण अरविंद जगताप, संतोष कोल्हे, समीर पाटील व सोनाली कुलकर्णी या मान्यवरांनी केले. थेंब या लघुपटाची संकल्पना, दिग्दर्शन धैर्यशील उतेकर यांचे आहे. यामध्ये ज्योती चन्ने, रूपाली इंगवले, साक्षी इंगवले यांच्या भूमिका असून निर्मिती आशा उत्तेकर यांनी केले आहे. चित्रीकरण केतन मोहिते, संकलन शशिकांत शेलार, निर्मिती सहाय्य अमोल जोशी व सहाय्यक दिग्दर्शक अभिषेक परदेशी आहेत.
सागर व संतोष चन्ने यांचे सहकार्य लाभले. याच्या चित्रीकरणावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते. पाण्याच्या समस्येवरील या डॉक्युड्रामामध्ये एकही शब्द बोलला गेला नाही. फक्त हवेचा आवाज आणि पाण्याला निघालेल्या महिला एवढेच चित्रीकरण आहे. पाणी आणणे हे किती वेळखाऊ काम आहे. त्यात गावातल्या महिलांचा पूर्ण दिवस जातो. हे किती कंटाळवाणे काम आहे, याचे चित्रीकरण यामध्ये आहे. चित्रपट लेखक-दिग्दर्शक नितीन दीक्षित, ज्येष्ठ कवी प्रमोद कोपर्डे, धोंडिबा कारंडे, अभिनेते बाळकृष्ण शिंदे, किरण ढाणे, संदीप जंगम, रवींद्र डांगे, प्रसाद नारकर, प्रसाद देवळेकर, प्रकाश टोपे, नितीन देशमाने, शिवानी पावटे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.