नगर – अयोध्येमध्ये श्रीरामाचे भव्य, रेखीव व आकर्षक मंदिर पूर्णत्वास येत आहे. या मंदिराची हुबेहूब चांदीची छोटी प्रतिकृती नगरच्या अर्बन बँक रोडवरील वसंतलाल रसिकलाल बोरा या सुवर्ण पेढीच्या कारागिरांनी घडवली आहे. श्रीराम मंदिरावर असलेल्या नक्षिदार कोरीव कामा प्रमाणेच कोरीव काम या चांदीच्या मंदिरावर नाजूकपणे करण्यात आले आहे.
याबद्दल माहिती देताना सुवर्णपेढीचे संचालक अतुल बोरा म्हणाले, पर्णपणे चांदीत घडवलेल्या ही श्रीराम मंदिराची प्रतीकुती ६०० ग्रॅम वजनाची असून ते घडवण्यास कारागिरांना १० ते १२ दिवसांचा अवधी लागला आहे. श्रीराम मंदिराची चांदीची
प्रतिकृती अयोध्येत पुन्हा श्रीराम मंदिर होत असल्याच्या आनंदाप्रती घडवण्यात आली आहे. अर्बन बँक रोडवरील वसंतलाल रसिकलाल बोरां पेढीमध्ये हे चांदीचे मंदिर सर्वांसाठी पहावयास ठेवण्यात आले आहे.
नगरच्या शिल्पकाराची आठ फायबर शिल्प अयोध्येत
अयोध्या येथे २२ ज्ञानेवारीला मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार श्रीराम आहे. अयोध्येत रामायणावर आधारित शिल्पसृष्टी तयार करण्यासाठी न्यासा कमिटीच्या वतीने देशभरातील १७ कलाकारांना निवडले होते. यामध्ये सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव सामंत यांच्यासह अन्य कलाकारांचा समावेश तारामायणावर आधारित चित्र सुदेव सामंत यांनी तयार केल्यानंतर स समितीने ते अंतिम केले. वणावर आधारित १०० चित्र निवडल्यानंतर त्याची मातीची प्रतिकृती नगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी करून फायबरमध्ये तयार करण्यात आली. त्यापैकी आठ शिल्प तयार झाले आहेत. पुढच्या पाच वर्षात आयोध्येत हे १०० शिल्प बसवण्यात येतील, अशी माहिती शिल्पकार कांबळे यांनी दिली.
अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. नगर शहरासह जिल्ह्यात या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आयोध्येत प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी तेथे तीन वर्षापासून शिल्पसृष्टीवर काम करणारे चित्रकार प्रमोद कांबळे हे नगरचे असून, मंदिराच्या चौथ्यावर रामायणातील विविध प्रसंग शिल्प कलेच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहेत. अडीच फूट उंचीचे हे शिल्प असून, पुढच्या पाच वर्षात तेथे शंभर शिल्प बसवण्यात येणार आहेत. चित्रकार सामंत यांनी प्रसंगाचे चित्र अंतिम केल्यानंतर त्या चित्रांचा मातीतील साचा नगरमध्ये तयार करण्यात आला आहे. मातीच्या साच्यानंतर या शिल्पाचे रूपांतर फायबर मध्ये झाले आहे. जयपूर व ओडिसा येथे बन्सी पहातपूर या दगडात या मूर्ती तयार होणार आहेत. विशेष म्हणजे पुढचे एक हजार वर्षे या मूर्ती आहे, तशाच राहणार आहेत.